मृत बिबट्याला ओढत नेले…शिकार झाली नाही, पण…

148

साता-यातील सह्याद्री व्याघ्र राखीव वन्यक्षेत्रातील हेळवाक वनपरिक्षेत्रातील गाढोखोप येथे बिबट्याचा सांगाडा आढळून आला. हा मृतदेह दोन आठवड्यांपासून सडलेल्या अवस्थेत असल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणाअंती समजले. ही घटना शिकारीची नसली तरीही दुस-या वन्यप्राण्यानेच मृत बिबट्याचे मांस फस्त केल्याचा अंदाज वनाधिका-यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : महाराष्ट्र पुरवणार ‘वाघ’! )

वनविभागाची माहिती

बिबट्या कदाचित वार्धक्यामुळे जागच्या जागीच मेला असेल. त्याला मृतावस्थेत पाहिल्यानंतर या भागांतील शिकारी कुत्रे, किंवा तरसांनी मृतदेह ओढत नेला असावा आणि नंतर कळपाने बिबट्याचे मांस फस्त केले असावे, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. बिबट्या ज्या ठिकाणी मेला त्या ठिकाणी त्याचे केस गळून पडले होते. नखेही गळून पडलेली त्याच ठिकाणी मिळाली. शरीरातील अवयव काढले नसल्याने ही शिकारीची घटना नसल्याची स्पष्टोक्ती वनविभागाने दिली आहे.

( हेही वाचा : राज्यात रंगणार ‘द्राक्ष’ महोत्सव! अशी करा नोंदणी… )

कोणाला आढळला बिबट्याचा मृतदेह

बुधवारी संध्याकाळी हेळवाक भागांतील गाढोखोप गावात देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे प्रशिक्षणार्थी सर्व्हेक्षणाचे काम करताना त्यांना बिबट्याचा मृतदेह आढळला. बाजे गावाच्या रस्त्यादरम्यान, खासगी मालकी क्षेत्रात बिबट्याचा सांगाडा आढळला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.