एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून, मागच्या तीन महिन्यांपासून कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्य सरकारकडून आंदोलनकारी कर्मचा-यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली. आता पुन्हा एकदा पुणे विभागाने पत्र लिहित, सर्व अधिकारी व आगार व्यवस्थापक यांना आंदोलन करणा-या कर्मचा-यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
कारवाई करा
16 फेब्रुवारीला दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जे आदेश देण्यात आले त्या आदेशांवर विनाविलंब तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. असे या पत्रात म्हटले आहे.
(हेही वाचाः शिवजयंती साजरी करतायंत? वाचा जाहीर झालेली नियमावली!)
या पत्रानुसार,
- जे कर्मचारी दिनांक 24/12/ 2019 अखेर कर्तव्यावर हजर झाले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची संप कालावधीतील अपराध प्रकरणे तात्पुरती दप्तरी दाखल करण्यात यावी.
- जे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले पण नंतर संपात सहभागी होऊन खात्याची दिशाभूल करून फसवणूक केली त्यांच्यावरील राज्य परिवहन महामंडळनुसार शिस्त व आवेदन पद्धतीने कारवाई पुढे सुरु ठेवावी.
- दिनांक 24 /12/2019 नंतर गैरहजर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई चालू ठेवण्यात यावी.
- बदली झालेले कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्यामुळे, मूळ कार्यालयाने किंवा आगाराने कारवाई करावी.
या वरील आदेशांनुसार तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे या पत्राच्या माध्यमातून सर्व अधिकारी व आगार व्यवस्थापक यांना कळवण्यात आले आहे.
(हेही वाचाः हुश्श! महागाईपासून सुटका, आता वाहनांना पेट्रोल-डिझेलची आवश्यकता नाही!)
Join Our WhatsApp Community