कोरोनामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. आता त्यातच हिंदुस्तान युनिलिव्हरने उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
अधिक पैसे मोजावे लागणार
हिंदुस्थान युनिलिव्हरने नवीन वर्षात सलग दुस-या महिन्यात उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. या कंपनीने आंघोळीचे, धुण्याचे साबण तसेच टाल्कम पावडरच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे उत्पादन घटकांच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढल्याने कंपनीने किमती वाढवल्या आहेत. गेल्या महिन्यात हिंदुस्तान युनिलिव्हरने साबण आणि कपडे धुण्याच्या पावडरच्या किमतीमध्ये वाढ केली होती.
( हेही वाचा :आदित्य ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय, भाजपच्या आमदाराचा हल्लाबोल )
‘या’ वस्तूंच्या किमतीत वाढ
एडेलवाईसने दिलेल्या माहितीनुसार, साबण, डिटर्जंट पावडर, डिशवाॅश आणि इतर वस्तूंच्या किमतीमध्ये 3 ते 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये सर्फ एक्सेल, ईझी वाॅश, सर्फ एक्सेल क्विकर वाॅश, विम बार, लक्स, रेक्सोना साबण आणि पाॅण्ड्स टाल्कम पावडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. जानेवारीमध्येही या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. ग्राहकांवर किंमत वाढ लादण्याआधी उत्पादनाशी संबंधीत विविध प्रक्रिया आणि पद्धतींचा उच्चतम वापर करुन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community