अरेरे! बेस्टचा ई-बसेसमध्येही घोटाळा!

115

बेस्टमध्ये तिकीट मशीन ट्रायमॅक्स कंपनीचा घोटाळा सुरू असताना आता बेस्टमध्ये ई-बसेसचा नवा घोटाळा समोर आला आहे. मुळात बेस्टच्या 900 ई बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की, कॉसेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी 3600 कोटीचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी दिला पण त्याच्यावर डल्ला विशिष्ट ठेकेदाराच्या भल्यासाठी मारला जातोय, असा सवाल भाजपकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला आहे. त्यामुळे बेस्टच्या 900 ई बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे.

मुंबईकरांसमोर पोलखोल करणार

निविदा 200 ई बसेसची गाड्यांची निघते ती नंतर 400 केली जाते आणि मंजूरी मिळेपर्यंत कुठलीही पुनर्निविदा न काढता ती 900 होते. वास्तविकतेत आपण कधी जमीनीवर उतरून पाहणी केली आहे का? की 900 दुमजली बसेस मुंबईच्या रस्त्यावर खरोखर त्या धावू शकतील का? याचा कधी फिजीबीलीटी रिपोर्ट घेतलाय का? किंबहुना ही खरेदी फक्त कागदावरतीच करायचा हेतू नाहीये ना? या कंपनीचं भाग भांडवल फक्त एक लाख रूपये आहे त्यांना तुम्ही 2800 कोटीचं कंत्राट कोणत्या आधारावर व कोणत्या हेतूसाठी देत आहात? याची आम्ही मुंबईकरांसमोर पोलखोल करणार तसेच 2800 कोटींच्या घोटाळ्याबाबत आम्ही कॅग आणि न्यायालयात दाद मागणार असेही पुढे कोटेचा म्हणाले.

(हेही वाचा – ‘भाजपला भुतानं झपाटलंय’, संजय राऊत भडकले)

शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क हिरावू देणार नाही

आम्ही मुंबईकरांचा मोकळ्या शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क तुमच्या घोटाळ्याने हिरावू देणार नाही. डिसेंबरमध्ये 200 दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा बेस्टकडून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मजुरी करतांना 200 च्या 900 बसेस एकंदरीत 3600 कोटींचे कंत्राट आणि त्यापैकी एक विशिष्ट कंपनी कॉसीस ई-मोबिलिटी (Causis E-mobility Pvt. Ltd.) यांच्या खिशात 700 बसेसची पुनर्निविदा न काढता 2800 कोटींचे कंत्राट घालण्याचे कारस्थान सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. या विषयावर पोलखोल करण्यासाठी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका हर्षिता नार्वेकर, रेणु हंसराज, बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.