संपाची रुखरुख तरीही ‘या’ जिल्ह्यात एसटी स्थानकांना मिळणार नवा-लूक!

150

एसटी महामंडळाचे विलिनीकरण राज्यशासनात करावे, यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. संपकरी कर्मचारी वारंवार विनंती करूनही कामावर हजर होत नाही. तसेच राज्यभरात आजही बहुतांश एसटी कर्मचारी संपावर असल्याने एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. एसटीचे कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची वाहतूक अद्याप सुरळीत सुरू झालेली नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसतेय. इतकेच नाही या संपाच्या काळात एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झाल्याचे देखील समोर आले आहे. अशातच लालपरीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील या ८ एसटी बसस्थानक नूतनीकरांसाठी ११ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची आनंदी बातमी आहे. त्यामुळे लवकरच या जिल्ह्यातील आठ बसस्थानकांचे आता रुपडे पालटणार आहे. या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

kolhapur

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आठ बसस्थानके आता नव्या रुपात दिसणार आहेत. यामध्ये इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, वडगांव, जयसिंगपूर, वाठार, गगनबावडा व मलकापूर या बसस्थानकाचा समावेश आहे. यामध्ये नवीन इमारतीसह सुशोभीकरण, काँक्रिटीकरण, प्रसाधनगृह, हायमास्ट दिवे यासारखे कामे केली जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी प्रवाशांची गर्दी असते. मात्र अनेक बसस्थानकांची दुरावस्था झाली होती. या बसस्थानकांचे नुतनीकरण होणार असल्याने प्रवाशांना आता चांगल्या सुविधा मिळणार आहेत.

‘या’ बसस्थानकांना मिळणार ‘नवा लूक’

  • इचलकरंजी, गडहिंग्लज बसस्थानक नूतनीकरण – प्रत्येकी रु. २ कोटी
  • वडगांव बसस्थानक नूतनीकरण – रु. १.४४ कोटी
  • कागल, गगनबावडा व मलकापूर बसस्थानक नूतनीकरण – प्रत्येकी रु. १ कोटी
  • जयसिंगपूर बसस्थानक विस्तारीकरण – रु. २ कोटी
  •  वाठार बसस्थानक पुनर्बांधणी – रु. १.५ कोटी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.