इर्षेपोटी १६ वर्षाच्या तरुणीने केलेले कृत्य वाचून हैराण व्हाल

132
इन्स्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रियकराच्या जुन्या प्रेयसीचे अश्लील छायाचित्रे अपलोड करुन तिची बदनामी करणाऱ्या अवघ्या १६ वर्षांच्या तरुणीला मुंबईच्या सायबर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. या तरुणीची रवानगी महिला बाल सुधारगृह डोंगरी येथे करण्यात आली असून, शुक्रवारी तिला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तिने हे कृत्य इर्षेपोटी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

धक्कादायक माहिती उघड

मध्य मुंबई परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने मुंबईच्या मध्य सायबर पोलिस ठाणे वरळी या ठिकाणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने तिच्या माजी प्रियकरासोबतची अश्लील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकण्यात आल्याची तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी इन्स्टाग्राम खाते तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या फोन नंबरचे निरीक्षण केले असता, १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीने तक्रारदार तरुणीची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी वापरलेला फोन तिच्या प्रियकराच्या वडिलांचा होता, अशी माहिती समोर आली.

( हेही वाचा :अवैध गर्भपात रोखण्यासाठी आता बक्षीसं! )

बाल सुधारगृहात  रवानगी
सायबर पोलिसांनी या अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिला तिच्या प्रियकराच्या माजी प्रेयसीबाबत ईर्षा निर्माण झाली होती. ती माझ्यापेक्षा सुंदर दिसते या इर्षेतून ही छायाचित्रे अपलोड केल्याची माहिती चौकशीत समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी १६ वर्षांच्या तरुणीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४-डी (पाठलाग करणे), ५०९(अश्लील शब्द, कृती किंवा हावभाव करणे) आणि ६७-अ (माहिती तंत्रज्ञान कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी तिची रवानगी महिला बाल सुधारगृह डोंगरी येथे करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.