महापालिका दलाली खाण्यासाठी नव्हे, तर कामे करण्यासाठी! फडणवीसांचा सेनेला टोला

133

शहर दत्तक घेतले म्हणजे रोज महापालिकेत हस्तक्षेप करून दलाली खायची असे नाही. शहरात एवढी कामे झाली आहेत, त्याच कारण आम्हाला राज्य दलाली खाण्यासाठी नाही, तर लोकांची काम करण्यासाठी हवे असते, असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपच्या विविध विकासकामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

राज्य मुंबईच्या बाहेर देखील असते

कोविडच्या काळात नाशिकवर अन्याय झाला. मात्र महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारली. राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळाले. हे जर जाऊन बसले नसते, तर नाशिकला ऑक्सिजन मिळाले नसते. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचे अस्तित्व नाही. राज्य मुंबईच्या बाहेर देखील असते, हे यांना माहीत नाही, अशी टोलेबाजी केली. मुख्यमंत्री म्हणून महापालिकेचा दोन-अडीच वर्षांचा काळ मिळाला. मेट्रो सुरू करावी, ही नाशिककरांची इच्छा होती. नाशिकचा नियो प्रकल्प पथदर्शी ठरला. आता हेच नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल देशभरात लागू होणार आहे. हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी आहे. केंद्राची मंजुरी मिळाली आणि राज्य सरकारने चालत्या सायकलमध्ये स्पोक घातला नाही, तर 3 वर्षांत नियो मेट्रो सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

(हेही वाचा काँग्रेसच्या मोर्चाचा मनोज कोटकांच्याही घरासमोर फियास्को)

राजकारणात केमिस्ट्री चालते

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावे लागेल. हे तिघे काहीही बोलले, तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील. राजकारणात 1 आणि 1 = 2 होत नाही. राजकारणात अर्थमॅटिक नाही तर केमिस्ट्री चालते, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.