शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांतील वादाने गेल्या काही दिवसांपासून उग्र रुप धारण केले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तर भाजप मधील सर्वच नेते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत.
महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ कायमंच आपल्या खास शैलीत संजय राऊतांवर टीका करत आहेत.आताही त्यांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या शिवराळ भाषेवर टीका केली आहे. शिव्या द्यायला शिवशिवणा-या शिवराळ मनस्थितीचं नाव ‘सर्वज्ञानी’ आहे, असं ट्वीट करत त्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
(हेही वाचाः महापालिका दलाली खाण्यासाठी नव्हे, तर कामे करण्यासाठी! फडणवीसांचा सेनेला टोला)
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेचा निषेध करताना चित्रा वाघ यांनी हिंदीतील एका म्हणीचा आधार घेतला आहे. शिव्या द्यायला शिवशिवणा-या शिवराळ मनस्थितीचं नाव सर्वज्ञानी आहे. गधे को दिया मान… गधा पहुँचा आसमान, असे ट्वीट करत त्यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.
शिव्या द्यायला शिवशिवणार्या शिवराळ मनस्थितीचं नाव “सर्वज्ञानी”
गधे को दिया मान…गधा पहुँचा आसमान 🤣#शिवीगाळ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 21, 2022
राऊतांनी केलं समर्थन
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्यावरुन त्यांना टीकेला सामोरं जावं लागत असतानाही त्यांनी आपल्या त्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. महाराष्ट्रद्रोह्यांना त्यांना समजणा-या भाषेतच उत्तर देणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
(हेही पहाः राऊतांची ‘ती’ भाषा मुख्यमंत्र्यांना पटते का?)
Join Our WhatsApp Community