देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेला आता वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात देशातील लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. देशातील सर्वच नागरिकांना लवकरात लवकर लसवंत करण्याचे भारत सरकारने ठरवले आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे.
१५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर आता १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी Corbevax या लसीला आपत्कालीन मान्यता देण्यात आली आहे. औषध नियामक मंडळ(DCGI)कडून ही मान्या मिळाली आहे. त्यामुळे देशात आता लवकरच १२ ते १८ वर्ष वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू होण्यास सुरुवात होणार आहे.
लसीकरणाला येणार वेग
हैद्राबादच्या ‘बायोलॉजिकल ई’ या कंपनीने ‘कॉर्बेवॅक्स’ (Corbevax) या लसीची निर्मिती केली आहे. १२ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास Corbevax लसीला आपत्कालीन मान्यता मिळाल्याने आता देशातील लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Drugs Controller General of India (DCGI) grants final approval to Biological E's #COVID19 vaccine Corbevax, for children between 12-18 years of age. pic.twitter.com/ad2xftvmzB
— ANI (@ANI) February 21, 2022
90 टक्के प्रभावी लस
हैद्राबादच्या बायोलॉजिकल-ई या कंपनीने Corbevax लसीची निर्मिती केली असून, ही लस कोविडविरुद्ध 90 टक्के प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाविरोधात भारतात तयार झालेली ही आरबीडी प्रोटीन सब-युनिटवर आधारीत लस आहे. दरम्यान बायोलॉजिकल-ई ने अलीकडेच लसीच्या 5-12 वर्षे आणि 12-18 वर्षे वयोगटासाठीच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. Corbevax ही भारतात विकसित झालेली तिसरी लस आहे. तर नॅनोपार्टिकल कोवोवॅक्स (COVOVAX) लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार आहे.
सर्वात स्वस्त लस
Corbevax ही लस आतापर्यंत भारतात मान्यता मिळालेल्या सर्व लसींपेक्षा सर्वात स्वस्त अशी लस असणार आहे. इत लसींप्रमाणेच या लसीचेही दोन डोस घेणे आवश्यक आहे. ही लस बाजारात 250 रुपयांपर्यंत उपलब्ध करुन दिली जाईल असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. लसीपासून नफा मिळवणे हे लक्ष्य नसून, लोकांची सेवा करणे हा आमचा हेतू आहे. त्यामुळे, इतर लसींच्या तुलनेत त्याचे दर कमी ठेवले गेले असल्याची माहिती बायोलॉजिकल-ई च्या वतीने देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community