सोमवारी फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा उजाडताच राज्यभरात गेल्या २४ तासांत केवळ ८०६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याची सुखद वार्ता आरोग्य विभागाने दिली आहे. ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्यातील तिस-या लाटेतील सर्वात कमी नोंद पहिल्यांदाच सोमवारी दिसून आली.
केवळ ४ जणांचा सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची ही संख्या देखील सोमवारी सर्वात कमी असल्याचे पहायला मिळाले आहे.
(हेही वाचाः आता १२ वर्षांवरील मुलंही होणार लसवंत! ‘या’ लसीला मिळाली मान्यता)
अशी आहे राज्यातील स्थिती
जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवड्यात ओमायक्रॉनची लाट वाढत असताना सावधानता बाळगत राज्यभरात १२ लाखांच्याही पुढे गेलेली घरातील विलगीकरणाची संख्या आता एक लाखांच्या आसपास नोंदवली जात आहे. राज्यात सध्या १ लाख ७६ हजार ३७८ रुग्ण घरी विलगीकरणात आहेत. तर केवळ १ हजार ३६ रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी थांबवणे ठरतेय धोकादायक!)
तिसरी लाट ओमायक्रॉन विषाणूचीच असली तरीही जनुकीय चाचण्यांच्या मर्यादेमुळे सर्वच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची जनुकीय चाचणी करता आली नाही. त्यामुळे आरोग्य विभागासमोरही नोंदीतील ओमायक्रॉनची यादी दरदिवसा जाहीर केली जात नाही. पुन्हा काही दिवसांच्या अवधीनंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने ५३ ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा अहवाल सोमवारी जाहीर केला. त्यापैकी ३१ रुग्ण पुणे शहरात, अहमदनगरमध्ये १९, पुणे ग्रामीण भागात २ तर लातूर शहरात एक रुग्ण आढळला.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९७.९४ टक्के
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
राज्यातील कोरोना पॉझिटीव्हीट रुग्णांचे प्रमाण – १०.१७ टक्के