सलमान नदीम खान नावाच्या विमान प्रवाशाने गोवा विमानतळावरून मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या विमानात गोंधळ घालून इतर प्रवासी, क्रू मेम्बर यांना तब्बल अर्धा तास वेठीस धरून त्याच्या आणि स्वतःच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा प्रकार गोवा ते मुंबई विमातळ दरम्यान रविवारी सकाळी घडला. या प्रकरणी सलमान खान सीआयएसएफच्या जवानांनी ताब्यात घेऊन विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली, कॅप्टनला भेटायचे आहे, असा हट्ट करून त्याने विमानातील प्रवाशांना वेठीस धरून त्याच्या जिवाला धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सलमानची विचित्र मागणी
सलमान नदिम खान (२८) असे या प्रवाशाचे नाव आहे. सलमान व्यावसायिक असून हा प्रवासी नॉर्थ दिल्ली येथे राहणारा आहे. सलमान हा रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोवा दाबोलीम विमानतळावरून मुंबईकडे येणाऱ्या गो इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करीत होता. मुंबईच्या दिशेने झेपावताच सलमानने स्वतःची बॅग घेऊन बाथरूमकडे निघाला. क्रू मेंबरने यांनी त्याला बाथरूम जवळ अडवून ‘तुम्ही बॅग घेऊन बाथरूममध्ये जाऊ शकत नाही’, असे सांगितले. त्यानंतर त्याने बॅग सीटवर ठेवून बाथरूमला जाऊन आल्यानंतर त्याने क्रू मेम्बरकडे सीट बदलून मागितली, परंतु विमानात सीट रिकामे नसल्याचे सांगून त्याला त्याच्या सीटवर बसण्यास सांगण्यात आले.
(हेही वाचा कोविड काळातील खर्चाचा ‘कॅग’ने हिशेब करावा : भाजप गटनेत्याची मागणी)
सलमान सीटवर उभा राहून गोंधळ घालू लागला
सलमानने सीटवर न बसता गॅंगवेमध्ये उभा राहून मी इकडेच उभा राहील असे बोलून गोंधळ घालण्यास सुरुवात केली, क्रू मेम्बरने यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता व त्याने मला तुमच्या कॅप्ट्नला भेटायचे आहे, असे सांगून पायलटच्या केबिनकडे जाऊ लागला, त्याला तेथे अडविण्यात आले “तुम्ही त्यांना यावेळी भेटू शकत नाही ” असे सांगून तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसा असे क्रू मेम्बरने सांगितले. मात्र तो भेटायचेच म्हणून हट्टाला पेटला असता क्रू मेम्बरने कॅप्टनला इंटरकाँमद्वारे कळविले, संबंधित प्रवाशाला सीटवर बसण्यासाठी सांगा विमान लँडिंग होण्याची वेळ झाली आहे, असे कॅप्टनने सांगितले. क्रू मेम्बर यांनी सलमानला वारंवार विनंती करून देखील तो ऐकत नव्हता. विमान लँडिंग होत असताना तो गॅंगवेमध्ये उभा असल्यामुळे पायलटला विमान लँडिंग करता येत नव्हते, पायलटने विमान लँन्डीगसाठी खाली आणले परंतु विमान लँण्ड करता येत नसल्यामुळे पुन्हा एकदा विमान हे वरती नेले व विमानाला एकदा ‘गो अराउन्ड करावे लागले लँण्डींगसाठी उशीर होत असल्यामुळे वैतागलेल्या इतर प्रवाशांनी त्याला बळजबरीने सीटवर बसवून त्याला सीटबेल्ट लावले. विमान धावपट्टीवर लँड होताच सलमान याने सीटवरून उठून पुन्हा गोंधळ घालू लागला. अखेर विमानातील कॅप्टनने सीआयएसएफ कक्षाला माहिती देताच सीआयएसएफचे जवान धावपट्टीवर धावत आले व त्यांनी सलमान या प्रवास्याला ताब्यात घेतले. त्याला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्या विरोधात क्रू मेम्बरने तक्रार दाखल केली. विमानतळ पोलिसांनी सलमान खान याच्या विरुद्ध प्रवाश्याना आणि करू मेम्बर यांना वेठीस धरून विमान धावपट्टीवर उतरविण्यास अडथळा निर्माण करून स्वतःच्या व इतर प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
Join Our WhatsApp Community