मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जलशुध्दीकरण यंत्र बसवण्यात आले असून त्यातील काही यंत्रे ही आधीच नादुरुस्त झालेली होती. त्यामुळे मुलांना पाणी पिण्याची गैरसोय होत होती, त्यातच कोविड काळामध्ये शाळा बंद असल्याने ही यंत्रच नादुरुस्त झालेली आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा बंद व्हायची वेळ आल्यानंतर याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक जलशुध्दीकरण यंत्रासाठी ४,८०८ रुपये खर्च
मुंबई महापालिकेच्या विविध माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण १६०० जलशुध्दीकरण यंत्र बसवण्यात आले असून याचा हमी कालावधीही संपुष्टात आला आहे. परंतु हमी कालावधीमध्ये संबंधित कंत्राटदाराने याची योग्यप्रकारे देखभाल न केल्याने शाळांमधील जलशुध्दीकरण यंत्रे ही बंद स्थितीतच होती. त्यामुळे या सर्व जलशुध्दीकरण यंत्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात येत असून यासाठी प्रत्येक यंत्रासाठी ४८०८ रुपये खर्च करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – वांद्रयाच्या किल्ल्याजवळ एक कोटींचा ट्री हाऊस!)
ही कंपनी ठरली पात्र
यासर्व जलशुध्दीकरण केंद्राच्या दोन वर्षांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५३ लाख ८७ हजारांचा खर्च करण्यात येणार असून देखभालीवर ६८ लाख ४० हजार रुपये याप्रमाणे २ कोटी २२ लाख २७ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी मेसर्स एक्वाकूल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे.
Join Our WhatsApp Community