भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाड्यांची गाडी कोसळली दरीत, १४ जणांचा मृत्यू

493

उत्तराखंडच्या चंपावत येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडलेल्या सुखीडांग-डांडामीनार रस्त्यावर रात्री लग्न संपवून परतणारे लग्नाच्या वऱ्हाड्यांची गाडी दरीत कोसळून हा अपघात झाला. दरम्यान 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 2 जण जखमी झाले आहेत. गाडीत एकूण 16 जण होते. तसेच जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे अपघाताचे कारण

यासंदर्भातील माहितीनुसार, ककनई येथील रहिवासी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंह याच्या लग्नाला सर्व वऱ्हाडी मंडळी गेली होती. मृतांपैकी बहुतेक लक्ष्मण सिंह यांचे नातेवाईक असल्याचं समजतंय. त्याचबरोबर चालकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक ककनई येथील डांडा आणि काथोटी गावातील आहेत. टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळेत एका लग्नाच्या कार्यक्रमात हे लोक सहभागी झाले होते. लग्न आटोपून परतताना ही दुर्घटना घडली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन एका खोल दरीत कोसळून हा अपघात घडला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

dolon

दुर्घटनेतील जखमींना 50 हजारांची मदत

पंतप्रधान  कार्यालयानं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, उत्तराखंडमधील चंपावतची घटना   हृदयविदारक आहे. यात ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराप्रती शोक संवेदना व्यक्त करतो.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेतील जखमींना 50-50 हजारांची मदत दिली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.