राज्यात कोरोनाचे अवघे १३ हजार ७० रुग्ण!

153

राज्यात आता कोरोनाचे केवळ १३ हजार ७० रुग्ण उरले आहेत. यात हजारांच्या पुढे रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, अहमदरनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत राज्यभरातील सक्रीय रुग्णांची संख्या दहा हजारापर्यंत खाली घसरेल, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे.

४७ कोरोना रुग्णांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला

सर्वाधिक सक्रीय रुग्णसंख्या पुण्यातच दिसून येत आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार, पुण्यात ४ हजार १६९ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्याखालोखाल मुंबईत १ हजार ३१५ रुग्णांवर उपचार सुरु होते. नागपुरात १ हजार १९२ तर अहमदनगरमध्ये १ हजार १३२ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मंगळवारच्या नोंदीत राज्यात नवे १ हजार ८० रुग्ण सापडले. तर २ हजार ४८८ रुग्णांना राज्यातील विविध भागांतून डिस्चार्ज दिला गेला. तर ४७ कोरोना रुग्णांनी उपचारादरम्यान आपला जीव गमावला. एकट्या पुण्याच्या ग्रामीण भागांत २१ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात एकाने जीव गमावला. मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सातारा, रायगड जिल्ह्यांत प्रत्येकी दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक शहर आणि ग्रामीण भाग, सोलापूर शहर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी शहर आणि ग्रामीण, नांदेड, अकोला आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नंदूरबार येथे तीन रुग्ण मृत्यू पावले.

  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९७.९६ टक्के
  • राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के

(हेही वाचा मान्यताप्राप्त पाच गर्भपात केंद्रांमध्ये आढळला धक्कादायक प्रकार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.