महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यव्यापी संपास सक्रिय पाठिंबा दिला आहे. आमदार नागो गाणार अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी तसे जाहीर केले आहे. शिक्षक शिक्षकेतर यांनी राज्यात सक्रीय सहभागी व्हावे.
या मागण्यासाठी दिला पाठिंबा
डी.सी.पी.एस., एन.पी.एस. रद्द करुन जुनी पेंशन योजना लागू करणे, अंशकालीन कंत्राटीकरण पद्धतीच्या रोजंदारीवरील कर्मचार्यांच्या सेवा नियमित करणे, केंद्र सरकारच्या धर्तीवर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे, बक्षी समितीने शिफारस केलेला खंड २ जाहिर करुन लागू करणे, ३० जून रोजी निवृत्त होणार्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना १ जुलैची वेतनवाढ लागू करणे इत्यादी मागण्यांसाठी शिक्षक परिषदेने संपास जाहिर पाठिंबा दिला आहे.
म्हणून शाळा बंद राहणार नाही, पण…
मुंबईत कोविड पार्श्वभूमीवर शाळा उशीरा सुरू झाल्याने काळ्या फिती लावून काम करणार आहेत. मात्र मुंबईतील कोविड परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रातील शाळा उशीरा सुरु झालेल्या आहेत. तसेच मुंबईतील शाळांमध्ये फारच कमी कालावधीत प्रत्यक्ष अध्यापन झालेले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शिक्षक परिषदेने काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून संपात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष उल्हास वडोदकर कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community