वाघ बिबट्या-मानव संघर्ष सुरु; वाघांना नैसर्गिक अधिवास देण्याची मागणी

135

चंद्रपूर येथील वीज केंद्र परिसरात वाघ आणि अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे वाघ व बिबट्या – मानव संघर्ष सुरु झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी वाघ जेरबंद करण्यात येणार असून, पकडलेल्या वाघांना नैसर्गिक अधिवास दया, अशी मागणी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य तथा इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांच्याकडे केली.

महाऔष्णीक वीज केंद्रात वाघ-मानव संघर्ष

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी प्रत्यक्ष भेटीतील चर्चेदरम्यान वीज केंद्र परिसरातील पकडण्यात येणाऱ्या मात्र मनुष्यहानीस जवाबदार नसलेल्या वाघांना निसर्गमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत संबधीतांना योग्य ते निर्देश दिले जाईल, असे आश्वासन दिले. सध्या चंद्रपूर शहरालगतच्या महाऔष्णीक वीज केंद्रात वाघ-मानव संघर्ष तर वेकोलीच्या परिसरात शक्तीनगर व दुर्गापूर वस्तीत लागून ‘बिबट-मानव संघर्ष’ वाढलेला आहे. घटनेची तिव्रता बघता वनविभागकडून सिटीपीएस परिसरातील वाघ पकडण्याचे आदेश प्राप्त आहेत. यात ज्या वाघांमुळे समस्या आहे ते पकडले जातील आणि अन्य सुध्दा, जे वाघ मानवी जिवीतास धोकादायक आहे. त्यांना कायम पिंजरा जेरबंद ठेवण्यात यावे, मात्र सदर औद्योगिक सिएसटीपीएस भागातील जे ‘वाघ’ कुठलाही मानवी घटनेत सहभाग नसलेल्या वाघांना त्याचे योग्य पुनवर्सन म्हणजे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी नियोजन आखण्याची विनंती बंडु धोतरे यांनी केली.

(हेही वाचा – महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या २ शिवसेना अन् भाजपच्या एका खासदाराला ‘संसद रत्न’ पुरस्कार)

वाघ पकडण्यात आल्यानंतर त्यांना वनविभागकडून वनक्षेत्रात मोठे ‘एनक्लोजर’ मध्ये ठेवण्यात यावे. वाघांचे शिकारीचे तंत्र विकसित करण्यात यावे, सदर वाघांचा अभ्यास करून, इतरत्र सोड़णे शक्य असल्यास त्यांना निसर्गमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील वाघविरहीत असलेल्या वनक्षेत्रात सोडण्याच्या दृष्टीने सुध्दा विचार करण्याची विनंती बंडु धोतरे यांनी प्रधान मुख्य वनंसरक्षक (वन्यजीव) सुनिल लिमये यांचाकडे केली. दरम्यान १७ फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नितीन भटारकर यांनी बेमुदत उपोषणाची उपोषणाची सांगता झाली. ऊर्जानगर व दुर्गापूर वासियांनी स्वेच्छेने एकत्रित होऊन मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवून मोर्चा काढला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.