राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
सरकारमधील नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पुन्हा एकदा आगपखड करायला सुरुवात केली आहे. पण भाजप नेत्यांनी देखील मलिकांच्या चौकशीबाबत एका वाक्यात मिश्कील ट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
(हेही वाचाः मंत्री नवाब मलिक यांना होणार अटक?)
राणेंचे हटके ट्वीट
कायमंच आपल्या प्रखर शैलीत विरोधकांवर टीका करणा-या नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या चौकशीनंतर एक ट्वीट केले आहे. पैहचान कौन असा प्रश्न विचारत त्यांनी त्यासोबत एक फोटो जोडला आहे. फोटो बघून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे आता तुम्ही ठरवा.
पैहचान कौन ? pic.twitter.com/gwSmWmDewq
— nitesh rane (@NiteshNRane) February 23, 2022
चित्रा वाघ
आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना धारेवर धरणा-या भाजपच्या वाघीण चित्रा वाघ यांनी देखील मलिकांच्या कारवाईबाबत एक ट्वीट केले आहे. डरनेका कायकू… असा सवाल त्यांनी मलिकांच्या चौकशीवरुन भाजपवर टीका करणा-या महाविकास आघाडी मधील नेत्यांना केला आहे.
(हेही वाचाः “भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकलंय का?” राऊतांचा सवाल)
डरनेका कायकू……
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 23, 2022
आशिष शेलार
भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील बालपणीच्या गोष्टीचा आधार घेत एक ट्वीट केले आहे. मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही.
पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच. अशी खोचक टीका शेलार यांनी केली आहे.
(हेही वाचाः राऊतांच्या ‘त्या’ विधानाकडे पवारांनी केले दुर्लक्ष)
मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….!
असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही.
पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 23, 2022
अतुल भातखळकर
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला, असे ट्वीट केले आहे. आता त्यामागे कारण कळण्याइतके सूज्ञ आपण नक्कीच आहात.
(हेही वाचाः मलिकांचं दाऊद कनेक्शन? ईडीने घेतलं ताब्यात अन्…)
Join Our WhatsApp Communityभंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022