कुठल्याही व्यक्तिला मूल दत्तक घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र बंधनकारक नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण प्रयागराज उच्च न्यायालयाने (अलाहबाद हायकोर्ट) नोंदवले आहे. रिना किन्नर आणि तिच्या जोडीदाराने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सदर मत नोंदवले.
…म्हणून मूल दत्तक घेता आले नाही
याचिकेत म्हटले आहे की, रीनाचा जन्म 1983 मध्ये झाला. त्यानंतर त्यांचा विवाह 16 डिसेंबर 2000 रोजी वाराणसी येथील अर्दली बाजार येथील महाबीर मंदिरात झाला. त्यांना एक मूल दत्तक घ्यायचे होते. पण, त्यांच्याकडे लग्नाचे प्रमाणपत्र मागितले, पण त्यांच्याकडे लग्नाचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे त्यांना मूल दत्तक घेता आले नाही.
(हेही वाचा: मलिकांच्या चौकशीवर भाजप नेत्यांच्या एका वाक्यात ‘टीका’! नक्की वाचा )
…तर घेऊ शकता मूल दत्तक
त्यानंतर रिना आणि त्यांच्या दिराने प्रयागराज उच्च न्यायालयात धाव घेतली. रिना यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी मूल दत्तक घेण्यासाठी विवाह प्रमाणपत्र ही अत्यावश्यक अट नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा, 1956 अंतर्गत एकल पालक देखील मूल दत्तक घेऊ शकतात, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community