अहमदनगरमधील कोरोना संख्याही आता हजारांच्या आत

122

राज्यातील कोरोनाचे प्रमुख हॉट स्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांधील अहमदनगरमध्ये आता रुग्णसंख्या हजारांच्या आत नोंदवली गेल्याची माहिती बुधवारी आरोग्य विभागाने दिली. ठाणे, रायगडपाठोपाठ आता अहमदनगरमध्येही रुग्णसंख्या हजारांच्या आत आली आहे. बुधवारच्या नोंदीत अहमदनगरमध्ये ९७६ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात आले.

मंगळवारच्या नोंदीत अहमदनगरमध्ये १ हजार १३२ रुग्णसंख्या होती. त्यात घट होत आता रुग्णसंख्या ९७६ वर नोंदवली गेली. अहमदनगर खालोखाल आता नागपूरातही गुरुवारपर्यंत रुग्णसंख्या हजारांच्या आत घसरेल. नागपूरची रुग्णसंख्या बुधवारच्या नोंदीत १ हजार८ वर दिसून आली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, अहमदनगर आणि नागपूरात कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून आला होता. त्यातील नाशिक, रायगड, ठाणे, अहमदनमध्ये रुग्णसंख्या आता हजारांच्या खाली उतरली आहे.

( हेही वाचा : अरेरे…२५ वर्षीय कामगाराचा मशीनमध्ये हात अडकून तुटला! पण … )

हजारांहून पुढे रुग्णसंख्या असलेले कोरोना हॉटस्पॉट जिल्हे –

पुणे – ३ हजार ८७४
मुंबई – १ हजार २२८
नागपूर – १ हजार ८

हजारांच्या आत रुग्णसंख्या आलेले कोरोना हॉटस्पॉट जिल्हे –

ठाणे – ८५८
रायगड – २५९
नाशिक – ४९४
अहमदनगर – ९७६

बुधवारची नोंद –

गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णांची नवी नोंद – १ हजार १५१
गेल्या २४ तासांत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – २ हजार ५१४

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९७.९७ टक्के
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.