मुंबईत कोविड लसीकरणाने गाठला दोन कोटींचा पल्ला

96

कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तींना मिळून २ कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबईने पार केला. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. कोविड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा तसेच प्रतिबंधात्मक मात्रा यांचा देखील त्यात समावेश आहे.

मुंबईसह देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड – १९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱ्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्च २०२१ रोजी आणि ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिल २०२१ रोजी, तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मे २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात आले. ३ जानेवारी २०२२ पासून वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील नवयुवकांचेही लसीकरण सुरु झाले आहे.

( हेही वाचा :  शिवसेनेचा लेखापरीक्षकांवर आक्षेप की स्थायी समिती अध्यक्षांवर? )

महानगरपालिकेची सातत्याने विक्रमी कामगिरी

लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. पहिली आणि दुसरी मात्रा यांचा एकत्रित विचार करता, ५ मे २०२१ रोजी २५ लाख, २६ जून २०२१ रोजी ५० लाख, ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख, ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर, २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख, १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख, दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी १ कोटी ७५ लाख लसीकरण पूर्ण झाले. तर २३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ कोटी कोविड लस मात्रांचा टप्पा गाठण्यात आला. यामध्ये १ कोटी ५ लाख ८५ हजार ५८० पहिल्या मात्रा, ९० लाख ९२ हजार ११८ दुसरी मात्रा तर ३ लाख २९ हजार ४७८ प्रतिबंधात्मक मात्रा समाविष्ट आहेत.

( हेही वाचा : फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, नाहीतर…! )

कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.

याप्रसंगी सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.