कर्नाटकातील शिवमोगा येथे २६ वर्षीय हर्षा नामक बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करीत मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी आज धुळे जिल्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदूत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला.
धुळ्यातील आग्रा रोडवरील राम मंदिरापासून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात सामिल तरुणांनी हातात भगवे ध्वज, विविध फलक हातात घेत घोषणाबाजी करीत सामिल झाले. मोर्चा आग्रा रोडवरून पारोळा रोड, मनपा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला. क्युमाईन क्लब येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. तसेच प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
(हेही वाचा बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी मलिकांचे व्यवहार! फडणवीसांचा घणाघात)
काय होते प्रकरण?
देशात हिजाब प्रकरणी चांगलंच वातावरण तापलं आहे. अशातच बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली. कर्नाटकातील शिमोगामध्ये हा प्रकार घडला. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचे नाव होता. त्याच्यावर चाकूने वार करुन हल्ला करण्यात आला. हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. हिजाब विरोधी पोस्ट केल्याने त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community