कुंडलीतील ३६ गुण जुळो-न जुळो, आरोग्य तपासणीतील गुणांना युवावर्गाचं प्राधान्य

162

कोरोना काळात आरोग्याबाबत आता सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये सजगता निर्माण झाली आहे. कोरोना काळात कशीबशी लग्नसराई आटोपली खरी मात्र आता कुंडलीतील ३६ गुण जुळो अथवा न जुळो, आरोग्य तपासणीतील गुणांना प्राधान्य देण्यात युवावर्ग पुढाकार घेत आहे. हा युवावर्ग फॅमिली फिजीशियनच्या मदतीने आपल्या आपल्या जोडीदाराबाबत अंतिम निर्णय घेण्याअगोदर आरोग्याबाबत मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करुनच बोलणी करत असल्याची नोंद होतेय.

जाणून घ्या तुम्हांला कोणत्या वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल आवश्यक आहे

  • * रक्तगट चाचणी (Blood Group Compatibility Test) – दोघांच्या रक्तगटात आरएच घटक समान असणं आवश्यक आहे.
  • * रक्त विकार चाचणी (Blood Disorder Test) – यामुळे हिमोफीलिया किंवा थॅलेसेमिया आहे का, याची माहिती मिळते. याचा थेट परिणाम अपत्यांवर होतो. त्यामुळे दोघांनी ही चाचणी करावी.
  • * अनुवंंशिक चाचणी (Genetic Test) – ही चाचणी केल्यामुळे भावी जोडीदाराला कोणता अनुवंशिक आजार आहे का, याची खात्री करता येईल. कोणताही आजार आढळल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतो.
  • * एसटीडी चाचणी (STD Test) – दोन्ही जोडीदारांनी ही टेस्ट करावी. जेणेकरून लग्नानंतर लैंगिक संसर्गाला कोणी सामोरे जाणार नाही.
  • * एचआयव्ही चाचणी (HIV Test) – दोन्ही जोडीदारांपैकी एका कुणाला एचआयव्ही असल्यास दुसर्‍यालाही त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे ही चाचणी दोन्ही जोडप्यांनी आवर्जून करावी.

(हेही वाचा – कोरोना काळातील महापालिका रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांची घोर उपेक्षा)

वधू-वरांचे रक्तगट एकसारखे असावेत, ही प्रमुख बाब लक्षात घेता आम्ही त्यांच्या नोंदणीच्या वैयक्तिक माहितीच्या कागदपत्रांवर रक्तगट नमूद करण्यास सांगतो. भावी जोडपी भेटताना ब्लड ग्रुप किंवा आरोग्यनिगडीत समस्यांबाबतीत चर्चा करत आहेत. पण एचआयव्ही, एसटीडी या चाचण्यांबाबत मोकळेपणाने अद्यापही बोलले जात नाही. लग्नापूर्वी केल्या जाणार्‍या चाचण्यांबाबत सतर्क असल्याचे जाणवले. ‘लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी’ या गोष्टीकडे बदलत्या काळानुसार पाहणे, स्विकारणे गरजेचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.