रशिया-युक्रेन युद्धाचे भारतात पडसाद! कशावर झाला परिणाम?

104

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे गंभीर परिणाम आता जगभरात उमटणार आहेत. या तिस-या महायुद्धाच्या सावटामुळे जगाला महागाईचा फटका बसणार आहे. देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी खळबळ उडाली आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता तर आहेच. तसेच, कच्च्या तेलाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.

शेअर बाजार कोसळला

मुंबई शेअर बाजार 1458 अंकांनी कोसळला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातही 387 अंकांची घसरण झाली आहे. तर ICICI बँकेचे शेअर्स उघडताच 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. सर्व सेक्टोरियल इंडेक्स (Sectorial Index) घसरणीच्या लाल चिन्हात बुडलेले आहेत. देशांतर्गत शेअर बाजार उघडताच निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1813 अंकांच्या जबरदस्त घसरणीसह 55,418 वर उघडला. तर निफ्टी 514 अंकांच्या घसरणीसह 16 हजार 548 वर उघडला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. 2022 मध्ये कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज खरा ठरला आहे, असे Goldman Sachs नं म्हटलं होतं. त्यावेळी, JP Morgan नंने 2022 मध्ये प्रति बॅरल 125 डॉलर आणि 2023 मध्ये प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

(हेही वाचा: पुतीन यांची अप्रत्यक्ष तिसऱ्या महायुद्धाची धमकी, म्हणाले…)

पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत गेल्या तीन महिन्यांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर, देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असून 10 मार्चला निकाल लागणार आहेत. निवडणुकांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करत नसल्याचं म्हटलं जात आहे. निवडणुकीनंतर, तोटा भरून काढण्यासाठी सरकारी तेल कंपन्या निश्चितपणे दर वाढवतील, असंही सांगितलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.