नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड दाऊदकडून जमिन खरेदी केल्याच्या आरोपाखाली बुधवारी ईडीकडून अटक करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिकांना अटक केली. या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहे. शिवसेनेनेही मलिकांची पाठराखण केली आहे.
नितेश राणेंचे ट्विट
कायमंच आपल्या प्रखर शैलीत विरोधकांवर टीका करणा-या नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 1993 च्या दंगली नंतर मुंबई माननीय बाळासाहेबांनी वाचवली. आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना, 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे. म्हणून आता भगव्याची जबाबदारी आमची असं ट्विट राणेंनी केले आहे.
९३ च्या दंगली नंतर मुंबई मा.बाळासाहेबांनी वाचवली..
आज त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना ९३ च्या दंगलीतील आरोपींना वाचवतो आहे..म्हणून.. आता भगव्याची जबाबदारी आमची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2022
( हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्धाचे भारतात पडसाद! कशावर झाला परिणाम? )
‘हे’ आहे प्रकरण
मनी लॉण्डरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. रोजची औषधांसोबत बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच घरचे जेवण आणि चौकशी दरम्यान वकिल सोबत बाळगण्याकरता अर्ज सादर करण्यात आला त्यावर गुरुवारी, 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.