महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आता त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. एकीकडे मविआ सरकारमधील नेत्यांनी भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचे म्हणत आंदोलन छेडले आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी मलिकांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मलिकांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले आहे. इतक्या गंभीर आरोपानंतर मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणं गरजेचं असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच भाजप महाविकास आघाडी सरकारचा चेहरा पूर्णपणे बेनकाब केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी आघाडी सरकारला इशारा दिला आहे.
(हेही वाचाः दाऊदचा भाऊ आणि नवाब आमने-सामने! ईडीकडून होणार चौकशी)
काय म्हणाले फडणवीस?
नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यावर भाजप नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, इतका गंभीर आरोप असताना आम्हाला राजीनामा मागण्याची वेळच यायला नका. नवाब मलिक यांनी स्वतः राजीनामा द्यायला हवा असे भाजपचे मत आहे, असे फडणवीस म्हणाले.
सरकारचा चेहरा बेनकाब करणार
भाजप या सरकारचा चेहरा पूर्णपणे बेनकाब करेल. त्याबाबतचा पक्षाचा जो काही निर्णय असेल तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जाहीर करतील, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे.
(हेही वाचाः कोठडीनंतरही नवाबांना ‘महा’पाठिंबा, तर राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन)
राजीनामा घेणार नाही
तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळालेल्या नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज मंत्रालयाजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहे. तर, शुक्रवापासून जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community