#Worldwar3 रशिया-युक्रेनमध्ये ‘जंग’…नेटकऱ्यांना चढलाय भलताच ‘रंग’!

123

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे सावट निर्माण झाले असून युक्रेनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी नाटोच्या सर्व देशांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या कारवाईत कोणत्याही देशाने हस्तक्षेप करण्याची हिंमत दाखवू नये, अन्यथा त्यांनी आजवर कधीही पाहिले नसतील इतके भयानक परिणाम त्यांना पहावे लागतील, अशा शब्दांत पुतीन यांनी अप्रत्यक्षपणे तिसऱ्या महायुद्धला सुरुवात करू, अशी धमकी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता ट्वीटरवर हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहेत. सध्या ट्वीटरवर #Worldwar3 हा हॅशटॅग ट्रेंड करत असून एकिकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या वाटेवर असतानाच दुसरीकडे नेटकरी मात्र याविषयाकडे गांभीर्यतेने न पाहता समाजमाध्यमांवर या युद्धाची, आंतरराष्ट्रीय संस्थांची खिल्ली उडवत आहेत. जाणून घेऊया असेच काही ट्रेंड…

( हेही वाचा : पुतीन यांची अप्रत्यक्ष तिसऱ्या महायुद्धाची धमकी, म्हणाले… )

नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आंतरराष्ट्रीय संस्था 

संयुक्त राष्ट्रे, नाटोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रशियाने युक्रेनवर हल्ला केला तरी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी या संस्थांवर निशाणा साधला आहे. शाळेत, महाविद्यालयांमध्ये संयुक्त राष्ट्रे (UN) विषयी महत्त्व, कार्य याचा विस्तृत आढावा दिला जातो. प्रत्यक्षात मात्र ही संस्था कुचकामी आहे, असा आरोप नेटकऱ्यांनी विविध मीम्स शेअर केले आहेत, तसेच अमेरिकेनेही या युद्धात काहीही हस्तक्षेप, समंजस्य करार केला नाही, यामुळे ट्वीटरवर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तर अनेकांनी जग एवढ्या भीषण परिस्थितीत असताना, मीमर्स मात्र याचा आनंद घेत आहेत, असाही प्रत्यारोप केला आहे.

( हेही वाचा : Russia Ukraine Conflict: भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातूनच आलं माघारी! )

https://twitter.com/abduljalilarif2/status/1496787771037523971

https://twitter.com/MrBIackOG/status/1496778702126002178

कोरोना काळानंतर अलिकडेच जग पूर्वपदावर येत असताना, लगेचच तिसऱ्या महायुद्धाचे ढग जमा झाल्यामुळे जगभरात भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. रशियाने हल्ला करूनही अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता शांत आहे, म्हणून ट्वीटरवर अमेरिकेला टार्गेट केले जात आहे. तर काही नेटकरी म्हणतात, सर्व महत्वपूर्ण युद्ध पुरुषांनी लढली आहेत, त्यामळे आता समानतेच्या धोरणानुसार हे युद्ध स्त्रियांनी लढावे, असा मिश्किल सल्ला दिला आहे. अनेकांनी उत्तर कोरियाच्या किम जोंगशिवाय युद्धाला सुरुवात कशी झाली, असाही सवालही या ट्वीटर ट्रेंडवर केला जात आहे.

परिस्थितीचे गांभीर्य बाळगा

या मीमर्स आणि खिल्ली उडवणाऱ्या नेटकऱ्यांना काही सुजाण नागरिकांनी मात्र चांगलेच फैलावर घेतले असून हे मीम्स बनवणे, खिल्ली उडवणे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगत युक्रेनच्या नागरिकांसाठी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच #StopWar असा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.