रशिया आणि युक्रेन यांच्या गुरुवारी, २४ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात रशियाने युक्रेनचे बरेच नुकसान केले आहे. त्यामुळे रशियाच्या तुलनेत युक्रेन खूपच कमजोर आहे. या दोन देशांचे लष्करी सामर्थ्य किती आहे, यावरून याचा प्रत्यय येत आहे.
मागील २ दशकांत रशियाच्या सैन्याचे चित्र बदलले आहे. त्यांचे सैन्य आधुनिक झाले आहे. अशा स्थितीत रशियाचा हल्ला असाच सुरू राहिला आणि युक्रेनला कोणत्याही देशाकडून मदत मिळाली नाही, तर ही लढाई कमी-अधिक प्रमाणात एकतर्फी होईल. युक्रेनला स्वतंत्र देश म्हणून सर्वप्रथम मान्यता देणाऱ्या देशांपैकी भारत एक होता. मात्र गेल्या तीन दशकांत युक्रेन आणि रशिया यांच्यातील संबंध कटू झाले आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. युक्रेनचा नाटो देशांकडे झुकणे हे एक मोठे कारण आहे.
(हेही वाचा Russia Ukraine Conflict: आता अमेरिका युद्धात उतरणार)
लष्करी खर्च आणि क्षेत्रफळ यात जमीन-आसमानाचा फरक
जर आपण क्षेत्राफळ पाहिलं तर विशाल रशियासमोर युक्रेन म्हणजे लहान मूल दिसते. रशियाचे क्षेत्रफळ युक्रेनच्या पाचपट जास्त आहे. रशियानंतर युक्रेन हा युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचा देश असला तरी तो हळूहळू विकसित होत आहे. रशिया त्यांच्या लष्करावर 61.7 अब्ज डॉलर खर्च करते, तर युक्रेनचे संरक्षण बजेट 5.4 अब्ज डॉलर आहे. यावरुन तुम्हाला अंदाज येऊ शकतो.
हवाई ताकद क्षमता
रशियाची ताकद अवकाशात नेहमीच उंच राहिली आहे. त्यांचे वर्चस्व संपूर्ण जगाने ओळखले आहे. रशियाकडे 4173 विमाने आहेत, जी युक्रेनच्या 772 विमानांपेक्षा सहापट जास्त आहे. रशियाकडे 318 लढाऊ विमाने आहेत तर युक्रेनकडे फक्त 60 आहेत.
सागरी शक्तीतही पुढे
या दोन्ही देशांच्या नौदलाच्या ताफ्यातही जमीन-आसमानाचा फरक आहे. रशियाच्या नौदल ताफ्यात 605 जहाजे आणि 30 पाणबुड्या आहेत, तर युक्रेनकडे फक्त 38 नौदल जहाजे आहेत आणि पाणबुड्या नाहीत. ही आकडेवारी सर्व विश्वसनीय साईट्सवरून घेण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community