गेल्या पाच वर्षात मुंबईत किती घडल्या आगीच्या घटना?

141

मुंबई शहर आणि उपनगरात वारंवार लागणा-या आगीनंतर अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित केली जात असून लवकरच अग्निसुरक्षा बाबत एकत्रितरित्या सर्व माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस कळविले आहे.

अग्निसुरक्षेची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईत लागणा-या आगी व उपाययोजना बाबत तक्रार करत आरोप केला होता की अग्निसुरक्षा बाबत कोणत्याही प्रकाराची माहिती उपलब्ध केली जात नाही. अनिल गलगली यांच्या तक्रारीची दखल मुंबई अग्निशमन दलाने गांभीर्याने घेतली आहे. प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी अनिल गलगली यांस कळविले आहे की भविष्यात मुंबई शहरातील सर्व इमारतीतील अग्निसुरक्षा संबंधीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होणाच्या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर माहिती एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे.

(हेही वाचा – Russia Ukraine Conflict: आता अमेरिका युद्धात उतरणार)

मागील 5 वर्षात आगीच्या एकूण संख्येत घट

मुंबई अग्निशमन दलाकडे शहरातील वर्ष 2006 पूर्वी बांधलेल्या सर्व इमारतींची माहिती उपलब्ध नसून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील कलम 3(1) आणि 3(3) नुसार माहे जानेवारी 2022 मध्ये प्राप्त झालेले 2556 फार्म बी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. अग्निशमन दलातर्फे माहे जून 2021 पर्यंत 6423 व्यक्तींना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर जून 2021 पासून 850 नागरिकांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. मॉक ड्रिल, एव्हँक्यूएशन ड्रिल, गृहिणीकरिता एलपीजी वायूची हाताळणीबाबत 95 प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर मागील 5 वर्षात आगीच्या एकूण संख्येत घट झाली आहे. यात वर्ष 2017 मध्ये 4454, वर्ष 2018 मध्ये 4959, वर्ष 2019 मध्ये 5324, वर्ष 2020 मध्ये 4512 आणि वर्ष 2021 मध्ये 3515 अशी संख्या आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.