बारावीची परीक्षा लटकली! कारण समजून घ्या… 

115

कोरोना संसर्गामुळे मागील वर्षी बारावीच्या परीक्षा झाल्याच नाही. यंदाही परीक्षा घेऊ नयेत, केवळ ऑनलाईन परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी नुकतेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तरीही शिक्षण विभागाने बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीही यंदाची परीक्षा लटकली आहे, असे चित्र आहे.

विद्यार्थ्यांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. भाषा विषयांचे पेपर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. 4 मार्चला परीक्षा सुरु होणार होती. 5 मार्चचे पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर 7 मार्चचे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहेत. 5 मार्चला सकाळी हिंदी तर दुपारच्या सत्रात जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन विषयाचे पेपर होणार होते. तर 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, (अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, आणि दुपारच्या सत्रात उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर होणार होता.

(हेही वाचा रशिया-युक्रेन युद्ध : कोणाचे किती आहे सामर्थ्य? जाणून घ्या…)

महाराष्ट्रातील बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा कधी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चमध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळे प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही, तर 5 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळात होतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.