युक्रेनमधील भारतीयांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना!

185

रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्धाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता जग तिस-या महायुद्धाच्या सावटाखाली आहे. रशियाकडून युक्रेनमध्ये हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. दोन देशांच्या या संघर्षात सध्या अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील दूतावासाकडून भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : #Worldwar3 रशिया-युक्रेनमध्ये ‘जंग’…नेटकऱ्यांना चढलाय भलताच ‘रंग’! )

मदतीसाठी हेल्पलाईन, पश्चिमेकडे स्थलांतराच्या सूचना

मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, भारतीय नागरिक युक्रेनच्या पश्चिमेकडे स्थलांतर करू शकतात. मात्र, आपल्यासोबत आपले पासपोर्ट आणि गरजेची कागदपत्र सोबत बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. अडचणीत असलेल्या नागरिकांनी मदतीसाठी दूतावासाची वेबसाईट, सोशल मीडिया आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मदतीसाठी नागरिकांना 38 0997300428, 38 0997300483, 38 0933980327, 38 0635917881, 38 0935046170 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

एकीकडे भारताकडून आपल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याआधीच रशियाने हल्ल्याचे आदेश दिल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. युद्धामुळे युक्रेनमधील विमानतळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी गेलेले विमानही माघारी फिरले. परिणामी आता पर्यायी मार्गांचा विचार केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.