गुरुवारी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १० हजार २५० ने कमी झाली. राज्यातील कोरोनाच्या प्रमुख हॉटस्पॉट झालेल्या प्रमुख जिल्ह्यांतून आता नागपूरचेही नाव खोडले गेले आहे. नागपुरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी हजारांच्या खाली नोंदवली गेली. नागपूरात आता कोरोनाचे ८२८ रुग्ण आहेत. आता पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांमधीलच रुग्णसंख्या हजारांच्या खाली येणे बाकी आहे.
( हेही वाचा : ब्लॉक कॉलर म्हणजे काय…वाचा… )
राज्यात आज १ हजार १८२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २ हजार ५१६ रग्णांना डिस्चार्ज दिला गेला. तर १९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. पुणे ग्रामीण व शहर, अहमदनगर, सातारा आणि पिंपरी-चिंचवडला नव्या ५८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती बीजे वैद्यकीय महाविद्यालयाने दिली. त्यापैकी पुणे शहरात ५२, पुणे ग्रामीण भागांत ३, अहमदनगर, सातारा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
ओमायक्रॉनचे रुग्ण उरले केवळ १११
राज्यात आतापर्यंत ४ हजार ५६७ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ हजार ४५६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ १११ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर राज्यातील विविध भागांत उपचार सुरु आहेत.
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९७.९९ टक्के