टीबी रुग्णांसाठी व्हर्च्युअल क्लिनिक

117

मुंबईतील काही औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांच्या थुंकीचा अहवाल क्लिष्ट असल्या कारणाने त्यांना जिल्हा स्तरावर औषधोपचार सुरू करणे कठीण जाते. अशा रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता ‘नोडल सेंटर’वर संदर्भित करावे लागते. या रूग्णांनी प्रवास केल्यास इतर नागरिकांना क्षयरोगाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा क्षय रूग्णांचा प्रवास कमी करणे व त्यांना त्यांच्या घराशेजारीच उपचार उपलब्ध होण्याची सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून मुंबईकरिता स्वतंत्र व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक( ‘Virtual Difficult to Treat TB Clinic’) कार्यरत केले जाणार आहे.

( हेही वाचा : २५ वर्षे भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे! )

देश क्षयमुक्त करण्याचे ध्येय

सन २०२५ पर्यंत भारत देश क्षयमुक्त करण्याचे ध्येय भारत सरकारने घोषित केले आहे. भारतातील एकूण क्षयरोग रूग्ण संख्येपैकी मुंबईमधे सुमारे ३ टक्के ‘औषध संवेदनशील’ (ड्रग सेंसिटिव्ह) क्षयरूग्ण व १४ टक्के ‘औषध प्रतिरोधी (ड्रग रेसिस्टंट) क्षयरूग्ण’ असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. महाराष्ट्रातील एकूण औषध प्रतिरोधी क्षयरूग्ण संख्येपैकी सुमारे ५८ टक्के ‘औषध प्रतिरोधी क्षयरूग्ण” हे मुंबईत आढळतात. मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी ४ ते ५ हजार औषध प्रतिरोधी क्षयरूग्णांचे निदान करण्यात येत आहे.

‘व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक’

मुंबईतील काही औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांच्या थुंकीचा अहवाल क्लिष्ट असल्याकारणाने त्यांना जिल्हा स्तरावर औषधोपचार सुरू करणे कठीण जाते व अशा रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता ‘नोडल सेंटर’वर संदर्भित करावे लागते. अशा क्षय रूग्णांचा प्रवास कमी करणे व त्यांना त्यांच्या घराशेजारीच उपचार उपलब्ध होण्याची सुविधा असणे ही काळाची गरज असल्याने या प्रकरणांचे मार्गदर्शन करण्यास मुंबईकरिता इको प्लॅटफॉर्म( ‘ECHO Platform’) हा उत्कृष्ट असा पर्याय उपलब्ध आहे व मुंबईतील औषध प्रतिरोधी क्षयरुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईकरिता स्वतंत्र ‘व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक कार्यरत करण्यात येत आहे. राज्य क्षयरोग विभाग स्तरावर व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक समितीमध्ये मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचा सहभाग असल्याकारणाने त्यांच्या ज्ञानाचा व उपचार पद्धतींचा लाभ मुंबईतील औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांना मिळाल्यास उपचाराकरीता ते बहुमोल ठरेल. त्या अनुषंगाने मुंबईतील एमडीआर (MDR) व एक्सडीआर( XDR) रूग्ण संख्या व इतर बाबी लक्षात घेता, केंद्रीय व राज्य स्तराच्या धर्तीवर व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक मुंबईकरिता या सुविधेचा २४ फेब्रुवारी २०२२, दुपारी ३ वाजता, निःक्षय दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाता, तसेच कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे ह्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक व मुंबईचे इको प्लॅटफॉर्म वापरुन कार्यान्वित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : स्थायी समितीची प्रत्यक्ष सभा अनधिकृत? )

स्वतंत्र ई-मेल पत्ता

औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांना उपचार सुरू करण्याकरिता मुंबईतील विविध जिल्हयांमध्ये २२ औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे कार्यरत असून, यापैंकी ४ औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे ही मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत ‘नोडल सेंटर’ म्हणून कार्यरत आहेत. इतर औषध प्रतिरोधी क्षयरोग उपचार केंद्रे ही या नोडल सेंटर’शी संलग्न करण्यात आलेली आहेत.

याबाबत मार्गदर्शन करताना कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ‘व्हर्च्युअल डिफिकल्ट टू ट्रिट टीबी क्लिनिक, मुंबई’ हे प्रौढ औषध प्रतिरोधी क्षयरोग रूग्णांच्या उपचाराकरिता महिन्यातून एक वेळा व औषध प्रतिरोधी बाल क्षयरोग रूग्णांकरीता दोन महिन्यातून एकदा अशा सभा ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’च्या माध्यमातून घेण्यात येईल. याठिकाणी रूग्णांना संदर्भित करण्याकरिता स्वतंत्र ई-मेल पत्ता कार्यरत करण्यात आला असून तो
[email protected] अशाप्रकारे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.