भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यरात्री होणार अधिवेशन, काय आहे कारण ?

146

सरकारकडून राज्यपालांकडे पाठवलेल्या अधिवेशन प्रस्तावातील त्रुटीमुळे विधानसभेचे अधिवेशन मध्यरात्री 2 वाजता होणार आहे आणि हे अधिवेशन पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. त्याच कारणही तस विशेष आणि हास्यास्पद आहे. राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्तावावर पीएम (प्रि- मिडनाईट) ऐवजी एएम (आफ्टर मिडनाईट) लिहिले होते. त्यावर राज्यपालांनी सही केल्यामुळे आता हे अधिवेशन मध्यरात्री 2 वाजता सुरू होणार आहे. अशाप्रकारे मध्यरात्री विधानसभा सुरू होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

ट्विट करत दिली माहिती

पश्चिम बंगाल सरकारने राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावात अधिवेशनाची वेळ चुकून दुपारी दोन ऐवजी रात्री दोन अशी टाईप झाली. म्हणजेच एम आणि पीएमने घोळ घातला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी गुरुवारी दुपारी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलवले होते. मात्र, अधिकारी वेळेत राज्यपालांना भेटण्यासाठी पोहचले नाहीत. त्यानंतर राज्यपालांनी ट्वीट करत कॅबिनेट प्रस्तावाला मंजुरी दिली. परंतु रात्री 2 वाजता सत्र सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांना आवडला नाही, असे देखील त्यांनी नमूद केले.

( हेही वाचा :#Worldwar3 रशिया-युक्रेनमध्ये ‘जंग’…नेटकऱ्यांना चढलाय भलताच ‘रंग’! )

आता मध्यरात्री होणार अधिवेशन

याविषयावर प्रतिक्रिया देताना विधानसभेचे सभापती बिमान बॅनर्जी म्हणाले, ही एक टायपिंग मिस्टेक होती. राज्यपाल या चुकीला टाळू शकत होते. परंतु तरी देखील त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे सत्र रात्री सुरू होणार आहे. राज्य सरकारने राज्यपालांना अगोदर दोन प्रस्ताव पाठवले होते. ज्यामध्ये अधिवेशनाची वेळ ही दुपारी दोन लिहिली होती. परंतु आता राज्यपालांनी प्रस्तावर सही केल्याने हे अधिवेशन मध्यरात्री सुरू होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.