एसटी महामंडळाने शक्कल लढविल्यानंतरही ‘लालपरी’ची चाकं थांबलेलीच…

109

गेल्या तीन महिन्यांपासून विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचा-यांनी अद्याप संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे एसटी मात्र जागच्या जागी उभी आहे. एसटीची सेवा पूर्णपणे सुरु नसल्याने, एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांबरोबर वाहक भरण्याचा निर्णय घेतला, पण कंत्राटी वाहक आणि चालकही एसटीला अद्याप मिळालेले नाहीत.

आंदोलकांची संख्या अधिक 

एसटीची सेवा सुरळित करण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालकांबरोबर कंत्राटी वाहकही भरण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघे 54 कंत्राटी वाहकच सेवेत येण्याच्या तयारीत आहेत. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. एसटीच्या 82 हजार कर्मचा-यांपैकी 54 हजार कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. 9 हजारपेक्षा जास्त चालक, वाहक सेवेत आले असून, 45 हजारपेक्षा जास्त चालक व वाहक अजूनही संपात सहभागी आहेत. त्यामुळे 16 हजार गाड्या असतानाही दिवसाला जेमतेम साडे तीन हजार बस धावत आहेत.

( हेही वाचा: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मध्यरात्री होणार अधिवेशन, काय आहे कारण ? )

केवळ इतकेच कंत्राटी वाहक

प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी चालक आणि वाहकांची भरती करुन एसटी सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ज्या ट्राॅयमॅक्स कंपनीला वाहक आणि चालक उपलब्ध करुन देण्याचे काम सोपवले होते, त्या कंपनीकडून केवळ 54 वाहकच मिळाले असून, त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.