यंदा मनसेचा वर्धापन दिन पुण्यातच का? जाणून घ्या कारण

134

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकच्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. यावेळी पुणे दौऱ्यावर असताना विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार असून पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मनसेचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या कारणामुळे सध्या पुण्यातील वातावरण मनसेमय झाले असून पुण्यात मनसेने आपले जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे.

कुठे होणार यंदाचा वर्धापन दिन

मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना 9 मार्च रोजी करण्यात आली होती. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेने राज्यातील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबईसह मनसेने यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

(हेही वाचा – यशवंत जाधवांवर यापूर्वीही झाली होती कारवाई, कोणतं होतं ते प्रकरण)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक

शनिवारी सकाळी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. तर, संध्याकाळी राज ठाकरे यांच्याहस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. शिवाय आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.