फ्रान्सने रशियाला ‘ही’ दिली भयंकर धमकी, ज्यामुळे जगाची उडाली झोप…

122

रशिया-युक्रेनमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवजवळ पोहचल्या आहेत. युक्रेन सुद्धा रशियाच्या आक्रमणाला जोरदार प्रतिउत्तर देत असून रशियाचे ३० हून अधिक रणगाडे युक्रेनकडून उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा युक्रेन संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दरम्यान फ्रान्सने रशियाला सर्वात मोठी धमकी दिल्याचे समोर आले आहे. हल्ले थांबवा अन्यथा नाटो देशांकडे अणुबॉम्ब आहे अशी थेट धमकी फ्रान्सने रशियाला दिली आहे.

तर मोठी दुर्घटना 

युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असून याचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे. आता रशियन सैनिकांनी चेर्नोबिल अणू प्लांटचा ताबा घेतला आहे. या भागात बॉम्बस्फोट झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते,1986 साली झालेल्या अपघाताची पुनारावृत्ती झाल्यास मोठा अनर्थ होईल त्यामुळे आम्ही जीवाची बाजी लावून या प्लांटचे संरक्षण करत आहोत. असे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी सांगितले. 1986 साली चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्रात मोठी दुर्घटना होऊन त्याच्या रेडिएशन दूरवर पसरून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. म्हणून या प्लांटचे युक्रेनकडून संरक्षण केले जात आहे.

( हेही वाचा : जगाच्या नकाशावर युक्रेन ‘एकटा’! अशी आहे तेथील परिस्थिती )

चेर्नोबिल भागात काही घडल्यास भयंकर परिणाम होतील, तसेच त्यापासून रशियाला काही फायदाही होणार नाही. युक्रेनचे सैनिक अफगाणिस्थानप्रमाणे पळून न जाता कडवा प्रतिकार करत आहेत. अशी माहिती सेवानिवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवलं जाणार आहे. सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी उड्डाणांचा खर्च फक्त केंद्र सरकार उचलणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.