गेल्या दोन वर्षांपासून वनिता समाज केंद्राने लोकांचे दु:ख, भीती, काळजी पाहिली. आता तेच वनिता समाज केंद्र माणसांठी गर्दी, रंगीबेरंगी सजावटीने फुलून गेले आहे. एवढे दिवस दादर शिवाजी महाराज उद्यानाच्या परिसरात लोक फेरफटका मारत असतानाही, कोरोना रुग्णांच्या भितीने वनिता समाज केंद्राकडे जाण्यास घाबरत होते. आता मात्र या परिसरात अगदीच विरुद्ध चित्र पहावयास मिळत आहे. लोकांच्या भीती, दु:खाचे रुपांतर आता आनंदात झाले आहे. वनिता समाज केंद्रासह शिवाजी महाराज उद्यान परिसर चहूबाजूंनी सजला आहे.
( हेही वाचा : राज्यात ‘या’ भागात दीड लाख लाभार्थी रेशनपासून वंचित! )
विशेष कार्यक्रमांचे आयोजन
ज्या वनिता समाज कल्याण केंद्रात दोन वर्षांपासून कोविड रुग्ण क्वारंटाईन होते, त्याच हॉलमध्ये आता महाराष्ट्र पर्यावरण व पर्यटन मंत्रायलयाने २५, २६ व २७ फेब्रुवारीपर्यंत आर्ट व फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. त्यामुळे अनेक दिवस भीतिदायक स्थिती अनुभवलेल्या वनिता समाज केंद्राचे आज खऱ्या अर्थाने शुद्धीकरण झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या फेस्टिव्हल करता विशेष पुढाकार घेतला आहे. तसेच २७ फेब्रुवारीला मराठी दिन असल्यामुळे विशेष कार्यक्रमाचेंही आयोजन करण्यात आले आहे.
आर्ट व फूड फेस्टिव्हल
वनिता समाज कल्याण केंद्रात आर्ट फेस्टिव्हल मध्ये तुम्हाला विविध सुंदर कलाकृती असलेल्या वस्तू पहावयास मिळतील. तर फूड फेस्टिव्हलमध्ये चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणाविषयी सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community