स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्यकवि गोविंद यांची कविता’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार, २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी म्हणजे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी होत आहे. सावरकर अभ्यासक आणि प्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने हे प्रकाशन होत आहे.
सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या ऑनलाईन प्रकाशन समारंभामध्ये सावरकर स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर तसेच या पुस्तकासाठी मोलाचे आर्थिक सहकार्य करणाऱ्या ९४ वर्षांच्या भानुमती घाटपांडे आजी या ही उपस्थित राहाणार आहेत.
(हेही वाचा फ्रान्सने रशियाला ‘ही’ दिली भयंकर धमकी, ज्यामुळे जगाची उडाली झोप…)
या आधी चार आवृत्त्या
सुमारे ७५ वर्षांनी हे पुस्तक प्रकाशित होत असून या आधी चार आवृत्त्या या नाशिकच्या महाबळ गुरुजींनी प्रकाशित केल्या होत्या. आता त्यांचे नातू रघुनाथ महाबळ यांचेही प्रकाशनासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले…या कवितेचे कवि गोविंद हे स्वातंत्र्यकवि कसे झाले, त्यांच्या कवितांची महती, साहित्यिक मूल्य आणि स्वातंत्र्यासाठीची उर्मी यासंबंधातही यात असलेल्या नामांकितांच्या समीक्षा ही देखील या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
Join Our WhatsApp Community