राज्यातील ओमायक्रॉन विषाणूमुळे अचानक आलेल्या तिस-या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या दुस-या आठवड्यानंतर सव्वा महिन्यातंच आता दहा हजारांच्या खाली आली आहे. या काळात तीन लाखांहून पुढे गेलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या शुक्रवारी दहा हजारांच्या आत नोंदवली गेली. शुक्रवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता कोरोनाचे केवळ ८ हजार ६८८ रुग्ण उरले आहेत.
त्यामुळे गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या राज्यातील जनतेला आता पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचाः मुंबईतील सरसकट सर्व शाळा ऑफलाईन!)
काय आहे शुक्रवारची आकडेवारी?
शुक्रवारच्या नोंदीत राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात एका टक्क्याने वाढ दिसून आली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आता घरी विलगीकरणात असलेल्या माणसांची संख्याही दीड लाखांच्या खाली उतरली आहे. राज्यात घरी विलगीकरणात आता केवळ १ लाख ४७ हजार ९७७ माणसांना ठेवण्यात आले आहे.
असे आहेत आकडे
गुरुवारी नोंदवलेले कोरोनाचे नवे रुग्ण – ९७३
गेल्या २४ तासांत बरे झालेले रुग्ण – २ हजार ५२१
गेल्या २४ तासांत मृत्यू पावलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १२
राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के
राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या – १७३
(हेही वाचाः रस्त्यावरील अन्नपदार्थ वर्तमानपत्रांतून विकाल तर खबरदार …)
Join Our WhatsApp Community