राज्यभरात पोलिओ लसीकरण मोहीम!

89

रायगड जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या 1 लाख 82 हजार 289 बालकांना 2 हजार 525 बुथवर पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.

( हेही वाचा : तिसरी लाट संपली? मग हा रिपोर्ट तुम्हाला वाचावाच लागेल… )

27 फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 1 लाख 82 हजार 289 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्याकरिता ग्रामीण भागात 2 हजार 382 आणि शहरी भागात 143 असे एकूण 2 हजार 525 बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त बस डेपो, रेल्वे स्थानक परिसरात सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सहभागी व्हा व सहकार्य करा

या कार्यक्रमासाठी 5 हजार 647 आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा संस्था, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे. 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण देण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.