मेट्रो स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या! भाजपने केली मागणी

113

गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानक असे करावे, अशी आग्रही मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच यासंदर्भात मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्रही दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस भाजप प्रदेशाध्यक्षांनी अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर नामकरण करावे

‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात याच ठिकाणी विदेशी कपड्यांची होळी करुन, ब्रिटिश सरकारला आव्हान दिले होते. त्यामुळे या परिसराचे आम्हा सर्वांसाठी वेगळे महत्त्व आहे’, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.‌ यावेळी ते मेट्रोने प्रवासही करणार आहेत.‌ त्यामुळे या मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकर करावे, यासाठी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या कडे पत्राद्वारे मागणी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : अखेर संभाजी छत्रपती बसले आमरण उपोषणाला, कारण… )

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत सचिन शिंदे, विलास आंबेकर, विवेक भाटकर, अक्षता तेंडुलकर, रवी  मेणकुरकर यांच्यासह महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.