मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रवास प्रदान करण्याच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून एक व्यापक धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात ही धुम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
एकूण १६० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली
या मोहिमेमध्ये, २४.२.२०२२ आणि २५.२.२०२२ रोजी, एकूण १६० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COPTA) – 2003 अंतर्गत रु. २९,७००/- दंड आकारण्यात आला. यामध्ये मुंबई विभागातून ६७ प्रकरणे व रु.१३,२००/- दंड, भुसावळ व नागपूर विभागातून प्रत्येकी ३७ प्रकरणे व रु.७,४००/- दंड, पुणे विभागातील ९ प्रकरणे व दंड रु.१५००/- दंड आणि सोलापूर विभागातील १० प्रकरणे व रु.२००/- दंड वसूल करण्यात आले. धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि COPTA-2003 अंतर्गत दंडनीय आहे. मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना रेल्वे आवारात आणि गाड्यांमध्ये धुम्रपान टाळण्याचे आणि स्वतःसाठी तसेच इतर प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.
(हेही वाचा हुश्श्य…युक्रेनवरून विमान मुंबईत दाखल; 219 विद्यार्थी मायदेशात परतले)
Join Our WhatsApp Community