स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान दंडबेडीची शिक्षा सहन केली होती. दंडबेडीची शिक्षा म्हणजे काय होतं? तुरुंगात सावरकरांचा अनुभव काय होता? हे इथे मुंबईतील मलबार हिल विधानसभा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अंदमानच्या जिवंत प्रतिकृतीच्या माध्यमातून मुंबईकरांना अनुभवता आले असल्याचे मत भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
आत्मार्पण दिनानिमित्ताने साकारला देखावा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा मुंबई गुजराती सेलच्या वतीने मलबार हिल क्षेत्रातील महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड येथे अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान अहोरात्र दंडबेडी सहन केली. दंडबेड्या काय होत्या, तुरुंगात सावरकरांसह अन्य क्रांतिकारकांचे अनुभव काय होते, हे महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड येथे अंदमानच्या जिवंत प्रतिकृतीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. ज्या सावरकरप्रेमींना अंदमानला जाता येत नाही, त्यांच्यासाठी हा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा उपक्रम सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भाजपा मुंबई गुजराती सेलच्या वतीने करण्यात आला असल्याचे लोढा यांनी सांगितले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, स्थानिक नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी वाहिली आदरांजली)
Join Our WhatsApp Community