मराठी भाषा दिन व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्ले शाखेचा वर्धापनदिन सोहळा प्रबोधनकार ठाकरे संकुल विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे तसेच ज्येष्ठ लेखक अरुण फडके यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे लिखित ‘देशोदेशीच्या लोककथा’ या ४ बाल कथासंग्रहाचे व लता गुठे लिखित मुलांसाठी मजेदार काव्यकोडी अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रबोधनकार ठाकरे संकुलचे अरविंद प्रभू आणि लेखक गुरुनाथ तेंडुलकर यांची विशेष उपस्थिती यावेळी होती.
पुरस्कार प्रदान
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विलेपार्लेच्या वतीने स्वरचित कथा स्पर्धेच्या पुरस्कारांचे वितरण मंदाकिनी भट आणि पूजा राईलकर यांच्या हस्ते झाले. चित्रा वाघ यांना प्रथम पुरस्कार, उज्वला पै यांना द्वितीय पुरस्कार आणि चारुलता काळे यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
( हेही वाचा: मुंबईसह या भागांत वीजपुरवठा खंडीत, लोकलही ठप्प! )
पुस्तकं माणसाला घडवतात
‘पुस्तकं माणसाला घडवतात’ या विषयावर, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, नगरसेविका, लेखिका ज्योती आळवणी यांच्याशी सायली वेलणकर यांनी सुसंवाद साधला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन सुरेख केले होते. सूत्रसंचालन प्रशांत राऊत व सायली वेलणकर यांनी केले,तर आभार निशा वर्तक यांनी मानले.
Join Our WhatsApp Community