चिंता नाही! आता २४ तास ‘या’ रूग्णालयात राहणार रूग्ण सेवा सुरू

161

पुण्यातील नवीन भोसरी रूग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन थेरगाव रूग्णालय आणि आकुर्डी रुग्णालय या चार रुग्णालयात 24 तास रूग्ण सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. महापालिकेच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात या बाबतची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांना मिळणार 24 तास वैद्यकीय सुविधा 

या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना 24 तास वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. परंतु, 24 तास रूग्ण सेवा सुरू करताना आवश्यक मनुष्यबळ कुठून आणणार असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत महापालिका रूग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 24 तास रूग्ण सेवा सुरू करण्यापूर्वी मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे.महापालिकेच्या ही चारही रुग्णालय नव्याने बांधण्यात आली आहेत. तसेच येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा लाभ शहरातील नागरिकांना होणार आहे. सद्यस्थितीत शहरात असलेल्या महापालिकेच्या रुग्णालयापैकी वायसीएम रुग्णालय सर्वात मोठे आहे. वायसीएममध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

(हेही वाचा – ‘मनसे विद्यार्थी सेने’ला मिळाले नवे ‘गुरुजी’! मराठी भाषा गौरव दिनी पक्षाचा मोठा निर्णय)

ताण कमी करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न

परिणामी येथे उपचार घेण्यासाठी शहराबरोबरच जिल्ह्यातून रूग्ण येत असतात. त्यामुळे सर्वाधिक ताण वायसीएम रुग्णालयावर येतो. ताण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. वायसीएमवरचा ताण कमी करण्यासाठी या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे. या चारही रूग्णालयात 24 तास रूग्ण सेवा सुरू झाल्यास वायसीएमवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.