गृहिणींचं बजेट कोलमडलं! १५ किलोच्या खाद्यतेलाचा डबा ‘इतक्या’ रुपयांनी महागला

129

कमी-अधिक दरांमुळे नेहमी चर्चेत राहणारे खाद्य तेल अलिकडच्या दोन दिवसांत पुन्हा एकदा चर्चेत आले असून, यावेळी तेलाने प्रति १५ किलोमागे तब्बल ३०० रुपयांची उसळी घेतली आहे. या उसळीमागे रशिया-युक्रेन युद्धाची पार्श्वभूमी विशद केली जात आहे.

तेलानंतर गॅसही महागणार?

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत अचानक तेलाचे दर वाढल्यामुळे अनेकांच्या घरचे बजेट बिघडले असून गृहिणींनी याबाबत प्रचंड नाक मुरडले आहे. तेल हा स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ झाली की त्याची झळ थेट गृहिणींना बसते. सध्या तिळासोबतच द्रव रूपातील इंधन, गॅसही महागणार असल्याची चर्चा कानावर येत असल्याने महिला वर्गाची नाराजी अधिक वाढली आहे. बाजाराचा फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे दर गेल्या चार दिवसांपूर्वी प्रति १५ किलोमागे २२३० ते २२५० रुपये होते. आज ते थेट ते २५३० ते २५५० च्या आसपास पोहोचले आहे. याचाच अर्थ घाऊक बाजारात प्रति किलो १९ ते २० रुपयांची वाढ झाली असून, हे तेल किरकोळ बाजारात येईपर्यंत ग्राहकांना प्रति किलोमागे २० ते २२ रुपये अधिक मोजावे लागतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्ध: तिसऱ्या महायुद्धाची नांदी?, वाचा ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत)

देशांतर्गत तेलाचे साठे मर्यादित झाले

एका तेल वितरक फर्मने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, युक्रेन हा भारताला कच्चे तेल आणि सनफ्लॉवरची निर्यात करणारा मोठा देश आहे. परंतु सध्या युद्ध सुरु असल्याने वाहतूक, वाहन उपलब्धता, प्रत्यक्ष कच्चे तेल आदी सर्वच बाबतीत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत तेलाचे साठे मर्यादित झाले असून, अंतर्गत पुरवठाही अडचणीत आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.