Russia Ukraine War : आतापर्यंत किती भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणले? जाणून घ्या…

86

रशिया-युक्रेनमध्ये मागील ५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतही भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन पाचवे विमान सोमवारी, २८ फेब्रुवारी सकाळी भारतात दाखल झाले. या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

आतापर्यंत ११०० हून अधिक भारतीय युक्रेनमधून मायदेशात आले आहेत. पण अजूनही अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानियातील बुखारेस्टमधून विमानाने आणण्यात आले. २४९ भारतीय एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत.

(हेही वाचा Russia Ukraine War : जग पुन्हा जातेय का अणु युद्धाच्या दिशेने?)

भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

युक्रेन सोडण्यासाठी रोमानिया आणि पोलंड सीमेवर पोहोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. पंजाबमधील एका विद्यार्थ्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये युक्रेनचे पोलीस बॅग घेऊन जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना लाथा मारताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत. पोलंड सीमेवरही मारहाण करण्यात आली आहे, असे छत्तीसगडच्या एका विद्यार्थ्याने सांगितले. दरम्यान युक्रेनला लागून असलेल्या ४ देशांतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नियंत्रण कक्ष उघडले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धात अण्वस्त्र हल्ल्याचा धोका वाढत आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी अण्वस्त्रसज्ज युनिटला हाय अलर्टवर ठेवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.