Russia Ukraine War : युक्रेनवर अणुबॉम्ब टाकला, तर किती मृत्यू होतील? जाणून घ्या विध्वंस… 

138

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चौथ्या दिवशी भयंकर वळण घेणार असे संकेत मिळत आहेत. कारण संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेने युक्रेनसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनसाठी तिजोऱ्या खुल्या केल्या आहेत, अशा सर्व परिस्थितीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी लष्कराला अणुहल्ला करण्यास तयार राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. असे झाले तर या युद्धात अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बचा वापर होईल. त्यातून मोठ्या संख्येने नरसंहार होणार हे निश्चित आहे.

एक अणुबॉम्ब ३ लाख जीव घेईल 

रशियाकडे असलेल्या अणुबॉम्बची क्षमता सर्वाधिक आहे. रशियाचा एक अणुबॉम्ब जर अमेरिकेच्या वॉशिंग्टनवर टाकला तर ३ लाख नागरिकांना जीव गमवावा लागेल. वॉशिंग्टनच्या शहराचे एकूण क्षेत्रफळ १७७ किमी आहे, तर युक्रेनची राजधानी कीवचे एकूण क्षेत्रफळ ८९२ किमी आहे. संपूर्ण कीव शहर नेस्तनाबुन करायला रशियाला अवघे ५-६ अणुबॉम्ब वापरावे लागतील. युक्रेनचे एकूण क्षेत्रफळ हे ६ लाख ३ हजार ६२८ किमी इतके आहे. संपूर्ण युक्रेनला भस्मसात करण्याइतपत रशियाकडे अणुबॉम्ब आहेत.

(हेही वाचा Russia Ukraine War : जग पुन्हा जातेय का अणु युद्धाच्या दिशेने?)

किती आहेत रशियाकडे अणुबॉम्ब?

रशियाकडे आजमितीस ६ हजार अणुबॉम्ब आहेत. याउलट अमेरिकेकडे ५ हजार ५०० अणुबॉम्ब आहेत. जगभरात १४ हजार अण्वस्त्र आहेत. यातील अर्ध्या संख्येने अण्वस्त्र एकट्या रशियाकडे आहेत.

काय होईल परिणाम?

रशियाचा अणुबॉम्ब जर युक्रेनवर टाकला, तर तब्बल ५८ किमी परिसरातील नागरिकांना तात्पुरती डोळ्यांना अंधारी येईल, थर्ड डिग्री तापमान वाढेल. ५० मैल अंतरापर्यंत किर्णोत्सर होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.