दहशतवादी झाकीर नाईकसोबत जोडले गेले संजय राऊतांचे नावं! का आणि कसे वाचा…

116

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवरील बंदीत केंद्र सरकारने ५ वर्षांची वाढ केली आहे. ही संघटना आतंकवादाला खतपाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. वीर सावरकर चरित्रकार प्रख्यात इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांच्या विरोधात बदनामीची मोहीम परकीय विद्यापीठांमधील डाव्या विद्यापीठीय विद्वानांनी सुरू केली आहे. त्यामध्ये भगोडा झाकीर नाईक याच्या बरोबर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील सामील झाले आहेत.

राऊतांचे मात्र मौन

अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ ही पहिली संघटना ठरली आहे. झाकीर नाईक सध्या मलेशियातून ‘इंटरनेट सॅटेलाईट टी.व्ही.’चा वापर करून जगभरातील त्याच्या अनुयायांशी संवाद साधतो, तसेच प्रचारासाठी सामाजिक माध्यम आणि मुद्रित साहित्य यांचाही वापर करतो, असा हा झाकीर नाईक डाॅ. विक्रम संपत यांच्या बदनामीत अग्रभागी आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे देखील यात सामील झाल्याची बातमी आली आहे. मात्र, ही बातमी येताच शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याचा विरोध  केला आहे. मात्र, स्वतः संजय राऊत यांनी अद्याप तरी याबाबत मौन बाळगले आहे.

(हेही वाचा Russia Ukraine War : युक्रेनवर अणुबॉम्ब टाकला, तर किती मृत्यू होतील? जाणून घ्या विध्वंस…)

अन्यथा कायदेशीर कारवाई होणार

डॉ. विक्रम संपत यांनी लोकसंगीत या विषयात पीएच डी मिळवली आहे. ते लंडनच्या रॉयल हिस्टरी सोसायटीचे फेलो आहेत. त्यांनी आपल्या संशोधन ग्रंथात वांङमय चौर्य अर्थात साहित्याची चोरी केली आहे. तसेच सावरकर चरित्रातील पहिल्या खंडात अशीच साहित्याची चोरी केली आहे, असा दावा पाश्चात्य विद्यापीठीय विद्वान ऑड्रेय ट्रश्के, अनन्या चक्रवर्ती, रोहित चोपडा यांनी करून त्यांच्या विरोधात मोहीम चालवली आहे. या मोहिमेविरोधात विक्रम संपत यांनी दिल्ली उच्च न्यायालयातून दिलासा मिळवला आहे. विक्रम संपत यांच्याविरोधात इथून पुढे कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बदनामीकारक मजकूर टाकता येणार नाही अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

खुल्या पत्रावर राऊतांची स्वाक्षरी?

त्यानंतर आता काही विद्यापीठीय विद्वानांनी विक्रम संपत यांचे नाव वगळून वाङ्‍‍मय चोरी अर्थात साहित्य चोरी याविषयी आपण व्यापक मोहीम राबवत असल्याचे म्हणत खुले पत्र रॉयल हिस्ट्री सोसायटीला लिहिले आहे. यामध्ये अनेक विद्वान प्राध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्राध्यापकांमध्ये इस्लामिक रिसर्च फाउंडेशन भगोडा संस्थापक झाकीर नाईक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. या दोघांचीही संबंधित खुल्या पत्रावर स्वाक्षरी आहे. झाकीर नाईक विरोधात मोस्ट वांटेड म्हणून भारत सरकारने नोटीस जारी केली आहे. भारतातून पळून जाऊन तो सध्या मलेशियात असल्याचे सांगण्यात येते. या झाकीर नाईकच्या नावाखाली संजय राऊत यांचे नाव आहे. तसेच त्यापुढे शिवसेना असे देखील स्पष्ट लिहिलेले आहे.

ट्वीट करत लगावला टोला

मात्र, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपण स्वतः संजय राऊत यांच्याशी बोललो असून त्यांनी कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचा खुलासा केला आहे, असे ट्विट केले आहे. परंतु स्वतः संजय राऊत हे मात्र याबद्दल अद्याप मौन बाळगून आहेत. या संदर्भातले ट्विट विक्रम संपत यांनी देखील केले आहे. संजय राऊत यांना काहीही माहिती नसताना, त्यांची स्वाक्षरी परस्पर विद्यापीठीय विद्वानांनी घेतली आहे. ही त्यांची “शैक्षणिक कामगिरी” आहे, असा टोला लगावत बाकीच्या स्वाक्षरी असलेल्या विद्यापीठीय प्राध्यापकांनी देखील आपापली नावे पाहून घ्यावीत, असे विक्रम संपत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. संपत यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे ट्विट आपल्या ट्विटमध्ये जोडले आहे.

( हेही वाचा: ‘राज्यपाल माफी मागा!’ छत्रपतींवरील विधानावरुन उसळला नवा वाद )

काय आहे प्रकरण?

विक्रम संपत यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. २०१९ साली ‘सावरकर : इकोज फ्रॉम ए फॉरगाटेन पास्ट 1883-1924’ आणि २०२१ साली ‘सावरकर: ए कन्टेस्टेड लिगसी 1924-1966’ अशी ही दोन पुस्तके आहेत. या पुस्तकांना जगभरातून मागणी आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये या पुस्तकांचा समावेश झाला आहे. हीच बाब डाव्या विचारवंतांना खुपत आहे. त्यांतील तीन प्राध्यापकांनी संपत यांच्या विरोधात तर मोहीमच चालवली. त्यांच्यामध्ये ऑड्रेय ट्रश्के हे प्रमुख आहेत. ऑड्रेय ट्रश्के या रुत्जर्स विद्यापीठाशी संलग्न आहेत, तर अनन्या चक्रवर्ती या जॉर्ज टाउन विद्यापीठाशी संलग्न आहेत आणि रोहित चोपडा हे सांता क्लारा विद्यापीठाशी संबंधीत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.