मागील तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली. उपोषण केल्यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
60 तासांपासून आमरण उपोषण
संभाजीराजे छत्रपती यांच ब्लड प्रेशर, शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना आम्ही इंजेक्शन घेण्यास सांगितले आहे. मात्र ते इंजेक्शन घेण्यास देखील तयार नाही, असेही डॉक्टर म्हणाले. तसेच त्यांनी लवकरात लवकर ट्रिटमेंट घ्यावी, असा सल्ला दिला आहे. गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झाले आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाइन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचे समजते.
(हेही वाचा ‘मला वर जायच नाही, तुमच्या सोबतच रहायचय’, असे का म्हणाले छत्रपती संभाजी?)
गरीब मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून…
माझी आमरण उपोषण करण्याची इच्छा नाही, पण माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शाहू महाराजांंची एकच शिकवण आहे, जी माझ्या रक्तात आहे, जे माझे संस्कार आहेत. महाराजांनी नेहमी अन्यायाविरोधात लढा दिला आहे, शाहू महाराजांनीही बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपलं जीवन वेचले. मी सुद्धा 2007 पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना, या गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी एसी, एसटी, ओबीसी समाजाला न्याय दिला होता. तसाच न्याय या गरीब मराठ्यांना मिळावा म्हणून, मी सुद्धा प्रयत्न करत आहे, असे छत्रपती संभाजी यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community